





राष्ट्रीय महिला दिनानिमित्त संकल्पसखी परिवारातर्फे स्त्री आरोग्य निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संकल्पसखी परिवाराच्या वतीने स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेष आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर 9 मार्च 2025 रोजी सूयोग मंगल कार्यालय, रुक्मिणी नगर, अमरावती येथे पार पडले.
या शिबिरात पाठीच्या तक्रारी, पाळीतील अनियमितता, शरीरावर अतिरिक्त केस येणे, वंध्यत्व, वारंवार गर्भपात, वजन वाढणे-कमी होणे, झोप न लागणे आणि नैराश्य यासारख्या अनेक आरोग्य समस्यांवर सल्ला देण्यात आला. तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टर डाॅ. प्रिया मोहोड (एम.डी.) यांनी महिलांचे मोफत आरोग्य परीक्षण करून आवश्यक मार्गदर्शन केले.
शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. शेकडो महिलांनी या संधीचा लाभ घेत आपल्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी तपासणी करून घेतली. अनेक महिलांनी आपल्या समस्या स्पष्टपणे मांडत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेतला.
संकल्पसखी परिवाराच्या सदस्यांनी अत्यंत उत्तम व्यवस्थापन करत महिलांसाठी हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले. उपस्थित महिलांनी अशा प्रकारच्या उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
संकल्पसखी परिवाराने पुढील काळातही महिलांच्या आरोग्यासाठी असेच उपक्रम राबवावेत, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली.