घरातील सर्वांची काळजी घेणारी पण स्वतःची वेळ आली की दुर्लक्ष कर सगळ्यांचा वेळ सांभाळून त्यांना वेळेवर जेवण घालणारी पण स्वत:च्या वे पाळणारी. सर्वांना ताजे गरम खाऊ घालणारी पण स्वत: मात्र शिळे अन्न संपवणारी, प्रत्येकाचे आरोग्य जपणारी पण स्वतःच्या आरोग्याविषयी कानाडोळा करणारी स्त्री बहुधा प्रत्येकच घरात बघायला मिळते.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात विविध टप्पे येतात, जे तिच्या शारीरिक व मानसिक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.
पौगंडावस्था, स्त्रीप्रजनन , रजोनिवृत्ती
शारीरिक समस्या स्त्रीप्रजनन ते रजोनिवृत्ती या काळात स्त्रियांना बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात
स्थूलता , उच्चरक्तदाब, मधुमेह, हाडे व सांध्याचे विकार, स्तनातील व गर्भाशयातील गाठी, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर,
मासिक पाळीच्या तक्रारी, अॅनिमिया, थायरॉइड, मानसिक तणाव, डिप्रेशन आदी
शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आरोग्य संतुलीत राहावे
प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकात खासियत आहे. जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणा ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेक वेळा ज्या विशेषतामुळे आपले नुकसान होते त्याच्या प्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो मग त्याच्यामुळे आपल्यात न्यूनगंड येतो. पण आपण हे जाणतो कि येथे प्रत्येक व्यक्ती एकमेवद्वितीय आहे, बस गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची.
व्यक्तिमत्वाबबत ९ उपाय सांगण्यात येते –
प्रोटॉन सारखे सकारात्मक रहा –प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही. तसेच आपण ही बना कदाचित ती तणावामुळे कमी होऊ शकते. आणि आपली ऊर्जा कमी करतो.
सकारात्मकतेत राहून आपण कठीण ते कठीण समस्या सोडवू शकतो. जेणे करून आणखी सकारात्मकता आणि शक्यतांना आपल्याकडे आकर्षित करतो.
अधिक उत्साही बना –अधिक उत्साहात काम करणे हे कोणतेही काम करण्याचे उत्तम प्रयत्न करतो तेव्हा आपण उत्कृष्ट अनुभव करतो.
भावनांना काळजीपूर्वक हातळा – जेव्हा जीवन तुम्हाला भावनांचा रोतर कोस्टरमध्ये बसवून फिरवत असते तेव्हा त्याचा देखील आनंद घ्या. आपल्या भावनांना आपल्यावर नियंत्रण घेऊ देऊ नका तर त्यांच्यावर आपले नियंत्रण राहू द्या. यामुळे आपण समंस्यामध्ये शांत आणि एकाग्र बनतो.
स्वतः प्रतितसेच इतरांप्रति करुणा ठेवा –करुणामय रहा, जेव्हा आपले हातून तसेच इतरांच्या हातून चूक घडते तेव्हा मनातअढी बनू देऊ नका, सोडून द्या. हे माहीत असू द्या कोणीही परिपूर्ण नाही, प्रत्येकजण प्रगती करत आहे, या दृष्टिकोणामुळे स्वतःला तसेच इतरांना स्वीकारत जा.
प्रशंसा करा –ज्या ज्या वेळी आपण कोणाची तरी खुल्या मनाने प्रशंसा करतो तेव्हा आपली चेतना विस्तृत होते, त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह आणि उर्जेचा संचार वाटतो. ते गुण आपल्यामध्ये देखील वाढू लागतात आणि आपण आणखी प्रगत बनू लागतो.
प्रभावी संवाद कर –आपण इतरांशी आपला हजेरीने, उपस्थितीने किंवा आपल्या भावनांना अभिव्यक्त करत संवाद करत असतो. आपल्या संवादामध्ये स्पष्टता आणि लोक आपल्याला जी प्रतिक्रिया देतात ते आपल्यालाही खूप लाभदाई असते.
संकटांचा सामना धैर्यात करा –संकटाचादबावघेऊनगळून जाऊ नका. तुम्ही आत्मविश्वासाने समोर जा यामुळे दोन गोष्टी होतील, तुम्ही विजयी तरी हात किंवा अपयश आल्यास शिकवण मिळते, तसेच एक चांगला अनुभव येतो.
धीर बाळगा –जीवनात यशस्वी होण्यासाठी धीर बाळगणे हे एक रहस्य आहे. गडबड, गोंधळ, आणि चंचलतेमधील प्रतिक्रियामुळे फायद्यापेक्षा नुकसानच होईल, ध्यान करा, शांती, धीर ठेवा यामुळे आपण तनावमुक्त राहून जलद निर्णय घेऊ शकतो.
प्राणायाम –प्राणायामशिका, सुदर्शन क्रिया करा, शेवटचे पण अत्यंत महत्वाचे प्राणायमामुळे आपण तनावविरहित आणि सकारात्मक जीवन प्राप्त करू शकतो.
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे विविध आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत या आजारांसोबत व्यक्तीला मानसिक आजारही बळावत आहेत.
जगभरातील कोट्यवधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत. रोगांचे निदान, चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ठ करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो.
डॉ. प्रिया मोहोड, एम. डी. (होमियोपॅथी)
मो. 8329734181